Wednesday, June 25, 2025

‘झुकेगा नही साला…’ ‘पुष्पा 2’ साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनला  संपूर्ण भारतात ‘पुष्पा’  या चित्रपटामुळे ओळखू लागले.या चित्रपटानं अल्लू अर्जुनची लोकप्रियता ही प्रचंड वाढली. अल्लू अर्जुन सध्या त्याचा ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

दरम्यान, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुननं ज्या मानधनाची (Fees ) मागणी केली त्यामुळे तो चर्चेत आला आहे. आता अल्लू अर्जुन हा तेलगू चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. Siasat.com नं दिलेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुननं सगळ्यात आधी चित्रपटासाठी मानधन म्हणून 150 कोटींची मागणी केली होती.

हे वाचा : हवामान विभागाचा इशारा राज्यात उद्यापासून ‘इतके’ दिवस कोसळणार पाऊस.

मात्र, त्यासाठी निर्माते तयार नव्हते आणि त्यांनी 125 कोटी रुपये मानधन (Fees ) देण्यास स्विकृती दिल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अल्लू अर्जुननं हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. तर ‘पुष्पा 2’ हा ‘बाहुबली 2’ आणि KGF 2 यांचे रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म