दाक्षिणात्य सुपरस्टार (Entertainment) धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत या दोघांनीही त्यांचे १८ वर्षांचे वैवाहिक जीवन मोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.नुकतीच, दोघांनी एकत्र पोस्ट जारी करून, घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता दोघेही पॅचअप करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत धनुषचे वडील कस्तुरी राजा यांना धनुष-ऐश्वर्याच्या पॅचअपबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना कस्तुरी राजाने असे काही सांगितले की, ज्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ते एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मुले सुखी राहावीत अशी त्यांची आणि त्यांच्या पत्नीची इच्छा होती’.
हे वाचा : अंत्यसंस्कारासाठी गेल्यावर कुणी सेल्फी काढतं का?, पहा या तरुणांसोबत काय झालं?
धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर (Social MEedia) पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘मित्र, जोडपे, पालक आणि हितचिंतक म्हणून 18 वर्षे एकत्र राहण्याचा प्रवास समजूतदारपणाचा आहे. पण आज आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा.”
(Entertainment) धनुष आणि ऐश्वर्या दोघांनाही अफेअरच्या अफवांनी धक्का बसला. त्यावेळी धनुषचे वय 21 वर्षे आणि ऐश्वर्याचे वय 23 वर्षे होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी दोघांनी लग्न करण्याची मागणी केली. त्यानंतर 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोघांनी घाईघाईत लग्न केले. हा विवाह रजनीकांत यांच्या घरी पार पडला. त्यांना राजा आणि लिंगराज नावाची दोन मुले आहेत. आता दोघांनीही 18 वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.