टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. इलियानाने प्रेग्नन्सी जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘.. आणि प्रवासाला सुरुवात’ असा मजकूर त्या ड्रेसवर लिहिण्यात आला आहे.
तर आणखी एका फोटोमध्ये इलियानाच्या गळ्यात एक पेंडंट पहायला मिळतंय. ‘मम्मा’ अशा अक्षरांचा तो पेंडंट आहे. हे दोन्ही फोटो पोस्ट करत इलियानाने कॅप्शनमध्ये ‘लवकरच..’ असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इलियानाची आई समिरा डिक्रूझ (Bollywood) यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलं, ‘या जगात लवकरच माझ्या नातूचं स्वागत होईल. मी फारत उत्सुक आहे.’ मात्र इलियानाने गरोगर असल्याचं जाहीर करताच अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. ‘लग्न कधी झालं’, असा सवाल एकाने केला. तर ‘बाळाचा होणारा पिता कोण आहे’, असंही दुसऱ्या युजरने विचारलं. ‘इलियानाने लग्न कधी केलं? हे दत्तक घेतलेलं बाळ आहे का? मला ती खूप आवडते म्हणूनच जाणून घ्यायची उत्सुकता आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊो सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते.इलियाना बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. हे दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर इलियानाचं नाव कतरिनाच्या भावाशी जोडलं गेलं. मात्र या दोघांनी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर कधीच त्याची कबुली दिली नाही.
इलियाना (Bollywood) सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र खासगी आयुष्यामुळे तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कतरिनाच्या भावाला मुंबईत आणि राजस्थानमध्ये त्याच्या बहिणीच्या लग्नात पाहिलं गेलं होतं. इलियानाला तो गेल्या सहा महिन्यांपासून डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. इलियानाने कतरिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये विकी कौशल, कतरिना कैफ, इलियाना, सेबॅस्टिनय, इसाबेल कैफ, आनंद तिवारी आणि मिनी माथुर पहायला मिळाले होते.
View this post on Instagram