भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह(Instagram Story) आता कसोटी फॉरमॅटमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज बनला आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत बुमराहने मोठी झेप घेतली आहे. पण रँकिंगमध्ये आल्यानंतर जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर अशी एक स्टोरी पोस्ट केली की, ज्यामुळे सर्वजण गोंधळले आणि प्रत्येकजण बुमराह कोणावर निशाणा साधतोय याची चर्चा करू लागले.
जसप्रीत बुमराहने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने म्हटले आहे की, तुम्हाला एक-दोन लोकच साथ देतात, पण तुमचे कौतुक आणि शुभेच्छा देण्यासाठी हजारो लोक येतात. हा एक सोशल मीडिया मीम आहे, जो खूप व्हायरल होत आहे.
बुमराह (Instagram Story) बराच काळ त्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अनेकजण म्हणते होते, बुमराह काही आता कमबॅक करू शकणार नाही, त्याचे करियर संपले पण बुमराह जिद्दीने मेहनत करून सर्वांनाच आपल्या कामगिरीने शांत केले. आता जसप्रीत बुमराह दुखापतीतून पुनरागमन करून टीम इंडियासाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
त्यामुळे सर्वच स्तरावरून जसप्रीत बुमराहचे कौतुक होत आहे आणि भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून त्याला संबोधले जात आहे, अशा परिस्थितीत कदाचित बुमराहला तो कमबॅक करत असताना त्याला आलेले अनुभव, त्याच्यावर केली गेलेली वक्तव्ये आणि खरंच त्याला सर्वांकडून किती पाठिंबा मिळाला असेल, हे सर्वच या कौतुकादरम्यान त्याच्या डोळ्यासमोरून जात असेल.
जसप्रीत बुमराहने (Instagram Story) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये धुव्वाधार कामगिरी केली होती, बुमराहने अवघ्या दोन सामन्यांमध्ये १५ विकेट घेतल्या आहेत. तसेच आता तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती मिळणार नसून तो संघासोबत उपलब्ध असल्याचे संकेत मिळत आहेत. ही मोठी मालिका असल्याने बुमराहला तिसऱ्या सामन्यात विश्रांती मिळू शकते, असे यापूर्वी मानले जात होते. पण एवढा उत्कृष्ट फॉर्म असूनही बुमराहला विश्रांती दिली गेली असती तर ते चुकीचेही मानले गेले असते.