Monday, June 23, 2025

Money laundering आजरी आईला देखील भेटू शकत नाहीये जॅकलिन फर्नांडिस! ‘हे’ आहे कारण

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या प्रचंड चर्चेत आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात नाव समोर आल्यापासून जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आता अभिनेत्री आपल्या आजारी आईला देखील भेटू शकणार नाहीये. याचं कारण देखील हे मनी लाँड्रिंग प्रकरणचं आहे.

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असणारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या आजारी आईला भेटण्यासाठी बहरीनला जाऊ शकणार नाही. कोर्टाची सद्य भूमिका पाहून तिने परदेशात जाण्याची परवानगी मागणारा अर्ज मागे घेतला आहे.

जॅकलिनने २३ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी बहरीनमध्ये जाण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. मनी लाँड्रिंग  (Money laundering) प्रकरणात मिळालेल्या जामिनाच्या अटींनुसार जॅकलिनला परदेशात जाण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

त्याचवेळी, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ईडीने जॅकलिनच्या अर्जाला विरोध केला आणि म्हटले की, जॅकलिनला बाहेरगावी जाण्याची परवानगी दिल्यास कदाचित ती देशात परतणार नाही.परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या जॅकलिनच्या अर्जावर सुनावणी करण्यास कोर्टाने नाखूशी व्यक्त केली.

जॅकलिनची बाजू मांडणाऱ्या वकिलाला न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास अजूनही गंभीर टप्प्यावर आहे. अशा स्थितीत या प्रकरणात आरोप निश्चित होण्याची प्रतीक्षा असताना ती सदर याचिका मागे घेऊ शकते का? अन्यथा न्यायालय या प्रकरणी न्यायालयीन आदेश देईल. न्यायालयाची भूमिका पाहून जॅकलिनने  वकिलांशी बोलून ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.

जॅकलिन सध्या २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकली आहे, ज्याचा संबंध सुकेश चंद्रशेखरशी आहे. ईडीने केलेल्या चौकशीत जॅकलिनने कबूल केले आहे की, तिने सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या. ईडीच्या आरोपपत्रात देखील जॅकलिनचे नाव आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणामुळे जॅकलिनला परदेशात जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. यामुळेच जॅकलिन बहरीनला जाऊन आपल्या आईला भेटू शकणार नाहीये.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म