Friday, April 18, 2025

प्रतीकशी साखरपुडा केल्यानंतर (Actress) हृताला आला वाईट अनुभव; चाहत्यांना विनंती करत म्हणाली..

संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करत असलेला ‘किचन कल्लाकार’ हा शो सध्या चांगलाच गाजतोय. या शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ‘मन उडु उडु झालं’  या मालिकेतील अभिनेत्री (Actress) हृता दुर्गुळेनं हजेरी लावली.यावेळी हृतासोबत मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊतसुद्धा होता.

हृता आणि अजिंक्यने किचनमध्ये धमाल केली. यावेळी संकर्षणसोबत गप्पा मारत असताना त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही काही गोष्टी सांगितल्या. हिंदी टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत  साखरपुडा केल्यानंतर हृताला काही नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागलं.

याविषयी ती या शोमध्ये व्यक्त झाली. ‘सोशल मीडियावर तुला अशी कोणती गोष्ट सर्वाधिक खुपली’, असा प्रश्न संकर्षणने हृताला विचारला होता. त्यावेळी प्रतीकवरून हृताला ट्रोल केल्याची घटना तिने सांगितली.

काय म्हणाली हृता?

“सोशल मीडियावर माझा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. माझ्या खासगी आयुष्याबद्दल मी सोशल मीडियावर व्यक्त होत नाही. माझे सोशल मीडियावर 23 लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगावं अशी माझी इच्छा होती.

ते माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत असं समजून मी प्रतीक शाहसोबतच्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली. प्रतीक हिंदी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमधला आहे. माझ्या आयुष्यातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब मी सोशल मीडियावरील चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र त्यावरूनच त्यांनी मला ट्रोल केलं. मराठी अभिनेत्री (Actress) नेहमी हिंदी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांसोबतच लग्न का करतात, असं ते म्हणाले.

मला हिंदी टीव्ही शोजमध्ये काम करायचंय, म्हणून मी प्रतीकसोबत लग्न करतेय, अशीही टीका माझ्यावर झाली. काहींनी त्याच्या लूकवरही कमेंट केली. हे सर्व अत्यंत निराशाजनक होतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. हृताने यावेळी चाहत्यांना विनंतीदेखील केली. अशा कमेंट्सने एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात, त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्याच्या पोस्टवर कमेंट करण्यापूर्वी विचार करा, असं ती म्हणाली.

कोण आहे हृताचा होणारा पती?

प्रतीक शाह हा हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अभिनेत्री (Actress) मुग्धा शाह यांचा तो मुलगा आहे. प्रतीकने ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यांसारख्या हिट टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शिन केलं आहे. प्रतीक हा उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याच्या डान्सचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म