बॉलिवूड चित्रपट (actor) आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैया’ (अली फजल) च्या सासरची भूमिका साकारली होती. त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिर्झापूर वेब सीरिजमध्ये शाहनवाज प्रधानने गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. ते श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी) यांचे वडील परशुराम गुप्ता होते. मिळालेल्या माहिती नुसार शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने. त्यांना तातडीने मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज (actor) यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
हे वाचा : नागपुरात आहे राज्यातील सर्वात उंच शिवमूर्ती, पाहा तिथं कसा होणार उत्सव?
शाहनवाज यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेश तैलंग, ज्यांनी स्वतः ‘मिर्झापूर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे, त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. ‘शाहनवाज भाई आखरी सलाम!!! किती अप्रतिम माणूस होतास आणि किती अप्रतिम अभिनेता होतास. मिर्झापूर दरम्यान मी तुझ्यासोबत किती सुंदर वेळ घालवला यावर विश्वास बसत नाही.












