केजीएफ सिनेमातील (Movie) प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारे कृष्णा जी राव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. म्हणून त्यांना उपचारासाठी बंगळुरू येथील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. कृष्णा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना नक्की काय झालं होतं.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 08-12-22
हे अद्याप कळालेलं नाही. उतार वयात त्यांना प्रकृतीविषयी त्रास सुरु झाला होता. कृष्णा जी राव दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (Movie) प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान कृष्णा जी राव त्यांच्या एका नातेवाईकाकडे जात होते.
पण रस्त्यात त्यांना थकवा जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी देखील त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलं. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही.Hombale Films प्रॉडक्शनने त्यांच्या निधनाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. कृष्णा जी राव हे प्रसिद्ध अभिनेते होते. केजीएफ सिनेमात त्यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती.
ಕೆಜಿಎಫ್ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಂದ ತಾತ ಎಂದೇ ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಿದ್ದ ಕೃಷ್ಣ ಜಿ ರಾವ್ ಅವರ ನಿಧನಕ್ಕೆ ಹೊಂಬಾಳೆ ಚಿತ್ರ ತಂಡದ ಸಂತಾಪಗಳು. ಓಂ ಶಾಂತಿ. pic.twitter.com/wOBfgZWBpy
— Hombale Films (@hombalefilms) December 7, 2022