Monday, June 23, 2025

movies 2023 सालारनं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी रचला इतिहास

प्रभासचे नाव साऊथ सिनेसृष्टीतील(movies 2023) दिग्गज कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. प्रभासचा मोस्ट अवेटेड ‘सालार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड हाईप आहे. दरम्यान, ‘सालार’च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. अशा प्रकारे, प्रभास या चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनवर एक नजर टाकतो.

प्रभास स्टारर सलारला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा प्रंचड प्रतिसाद मिळाला होता. यामुळे ‘सालार’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस पाडला आहे. प्रभासच्या या चित्रपटाने(movies 2023) रिलीजच्या पहिल्याच दिवशी तगडी कमाई करत बॉक्स ऑफिसला हादरवलं आहे. आता सालारने रिलिजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची ओपनिंग केली ते जाणून घेऊया.

फ्लॉप चित्रपटाची रांग लागल्यानंतर प्रभासने सालारमधून जबरदस्त कमबॅक केलं आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या पहिल्या तब्बल 95 कोटींची ओपनिंग केली आहे.ही प्राथमिक आकडेवारी असली तरी अधिकृत आकडेवारी आल्यानंतर यात काही बदल होऊ शकतात.

हे वाचा : यूट्युबर्ससाठी खुशखबर! पैसे कमवण्यासाठी लाँच केले नवीन फीचर

सालारने तब्बल 95 कोटींची ओपनिंग दिल्याने आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर साउथ चित्रपटांनी वर्चस्व केल्याचे चित्र आहे. या आकडेवारीनुसार ‘सालार’ने शाहरुखच्या डंकीचं नव्हे तर ‘पठाण’, ‘जवान’ चित्रपटांना देखील खुपच मागे टाकले आहे.‘सालार’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 95 कोटींची ओपनिंग (movies 2023) सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या ओपनिंग डेचा रेकॉर्ड मोडला आहे. वर्षाच्या अखेरीस प्रभासचा सालार या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

शाहरुखच्या जवानाने पहिल्या दिवसाची कमाई 65.5 कोटींची ओपनिंग दिली होती तर पठाणने पहिल्या दिवशी 55 कोटी आणि अॅनिमलची पहिल्या दिवसाची कमाई 54.75 कोटी रुपये होती. त्यात आता प्रभासनं बाजी मारली आहे. हा तर केवळ पहिल्या दिवसाचा आकडा आहे. विकेंड पर्यंत चित्रपट किती कोटींची कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.‘सालार’ या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म