आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) काळजी वाढवणारी बातमी आहे. टीमचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 27 मार्च रोजी होणार आहे. सूर्याला भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील T20 सीरिजमध्ये दुखापत झाली होती.
सूर्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू आहेत. ही दुखापत मुंबईला भारी पडली आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवसह रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना मुंबई इंडियन्सनं रिटेन केले होते.
China आणि Pakistan सीमेवर Satelliteची नजर, संरक्षण मंत्रालयाचा लष्करासाठी मोठा निर्णय
काही दिवसांपूर्वी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार ‘सूर्या अद्याप एनसीएमध्ये आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो बरा होत आहे, पण आयपीएलमधील पहिली मॅच खेळू शकेल याची खात्री नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याला पहिल्या मॅचमध्ये न खेळण्याचा सल्ला देऊ शकते.’
सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) प्रमुख खेळाडू आहे. गेल्या काही सिझनमध्ये तीन नंबरवर त्यानं चांगली कामगिरी केली आहे. तो दुखापतग्रस्त होण्यापूर्वी जबरदस्त फॉर्मात होता. त्याची दुखापत हा मुंबई इंडियन्सला मोठा धक्का आहे.