सध्या सर्वत्र चर्चा आहे ती विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Stroy) या चित्रपटाची. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’नंतर हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आलेला सिनेमा आहे. या चित्रपटवरून रोज नवा वाद सुरू आहे.लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयावरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे.
पण या चित्रपटाला विशिष्ट गटाकडून कडकडून विरोध होत असून, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण काही जण हा चित्रपट आवर्जून पहा असेही सांगत आहेत.अशातच अभिनेते योगेश सोमन यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी थेट केरळ स्टोरी आणि रामदास स्वामींचा संबंध सांगितला आहे.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 10-05-23
अभिनेते योगेश सोमण यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा संबंध रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे. या व्हिडिओत ते म्हणाले आहेत की, ”दोन दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या चित्रपटावरून गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटाचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर काहीजणांनी चित्रपटाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले.’
‘याच दरम्यान अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो, ‘द केरळ स्टोरी’ची ‘ (The Kerala Stroy) वन लाइन’कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.”
‘किती गुजरिणी, ब्राह्मीणी भ्रष्टविल्या.. किती शांबूखी जहाजी फाकविल्या.. किती एक देशांतरी मेल्या.. किती एक हाल होऊनी मेल्या.. अशा या समर्थ रामदास यांच्या ओळी योगेश सोमन यांनी व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत.
पुढे ते म्हणतात, ” शांबूखी म्हणजे ‘शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, तर फाकविल्या’ म्हणजे ‘पाठवल्या’. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Stroy) मध्ये हे सांगितलं आहे ते रामदास स्वामींनी चार ओळीतून शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे.’ हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.
#समर्थ_रामदास_स्वामी#TheKerlaStory pic.twitter.com/c5bCnME2Dy
— Yogesh Soman (@shriyogeshwar) May 8, 2023