Monday, June 23, 2025

Viral video : रवीना टंडनच्या अडचणीत वाढ; काय आहे कारण?

अभिनेत्री रवीना टंडन सध्या एका व्हिडीओमुळे (Viral video) अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रवीना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. रवीना अनेकवेळा घरातील कर कधी भटकंतीचे व्हिडीओ शेअर करते. अशातच तिने नुकतचं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

रवीना टंडनने नुकतचं वाघाचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. कॅमेऱ्याच्या शटरचा आवाज क्लिपमध्ये ऐकू येतो आणि राखीव भागात एक वाघ तिच्याकडे पाहून डरकाळी फोडत असतो.

तिचा हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला असून तिच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, वन उपविभागीय अधिकारी  धीरज सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनंतर या व्हिडीओची चौकशी सुरू केली आहे.

हे वाचा : जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका

यासोबतच, 22 नोव्हेंबरला रवीना तिच्या कारमध्ये वाघापर्यंत पोहोचली होती. हे पाहिल्यानंतर आता या अधिकाऱ्याने चालक आणि तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.रवीनाने तिच्या सोशल मीडिया (Viral video) हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. तिने वाघां काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

रवीनाने या महिन्याच्या सुरुवातीलाच एक ट्विट केले होते. तिच्या या ट्विटनंतर भोपाळ येथील वन विहार राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी उद्यानातील वाघांच्या आवारात दगडफेक करणाऱ्या काही अज्ञातांच्या विरोधात तपास सुरू केला आहे. अशातच रवीनाने स्वतःचा हा व्हिडीओ शेअर केल्याने ती आता अडचणीत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म