‘बिग बॉस’ (Big Boss) सोळाचा विजेता एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेचा आलेख चांगलाच उंचावत आहे.पुण्याचा रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने बिग बॉसच्या घरात आपल्या अनोख्या शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.या घरातून त्याला एक नवी ओळख मिळाली आहे. परंतु ट्रॉफी जिंकत एमसीने आपली फॅनफॉलोईंग दाखवून दिली आहे.’
दरम्यान घरामध्ये सतत एमसी स्टॅनच्या गर्लफ्रेंडचादेखील उल्लेख होत असे. एमसी त्याला प्रेमाने बुबा अशी हाक मारतो.आपलं बुबावर प्रचंड प्रेम असल्याचं एमसीने वेळोवेळी कबुल केलं आहे. शिवाय घरात असताना नेहमीच आपल्यला तिची आठवण येत होती असंही त्याने सांगितलंय.
हे वाचा : बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, video viral
दरम्यान आता एमसी स्टॅनने बुबासोबतच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. एमसी स्टॅनने आपण गेली चार-पाच वर्षे बुबासोबत नात्यात असल्याचा खुलासा केला आहे.शिवाय आपल्याला या येत्या एक-दीड वर्षात बुबासोबत लग्नगाठ बांधायची असल्याचं सांगितलं आहे.त्यामुळे लवकरच (Big Boss) एमसी स्टॅन गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकलेला पाहायला मिळणार आहे.