उत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या (crime) करण्यात आली. प्रसारमाध्यमे आणि पोलिसांसमोरच अतिकवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्याकांडानंतर देशभरात खळबळ माजली आहे. देशभरातून प्रतिक्रिया येत असताना उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्न ही उपस्थित होत आहेत. हल्लेखोरांनी अतिकवर गोळ्या झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या का चालवल्या नाहीत?; असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
१५ एप्रिलला अतिक व अश्रफ या दोघांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात आणण्यात आले होते. रात्री दहाच्या सुमारास हे दोघेही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. वृत्तवाहिन्यांचे कॅमेरेही यावेळी सुरू होते. काही जण मोबाइलमध्ये त्याचे चित्रीकरण करीत होते. हे सारे सुरू असताना, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या गराड्यातील दोघांनी अतिशय जवळून अतिक अहमद व अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोघेही रक्तबंबाळ होत जमिनीवर कोसळले व काही वेळातच त्यांनी प्राण सोडले.
हे वाचा : लग्न न करताच गरोदर झाली इलियाना डिक्रूझ; नेटकरी विचारतायत ‘बाळाचा होणारा पिता कोण?’