बल्गेरियाचे बाबा वांगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी (Prophecy) जगभर प्रसिद्ध आहेत. त्यानी वर्तवलेली भाकीतं खरी ठरली आहेत.तर बऱ्याचदा भविष्यवाणीबाबतचा त्यांचा अंदाज चुकीचीही ठरला आहे. आता बाबा वेंगा यांनी सन 2023 या येणाऱ्या वर्षाबाबत अत्यंत खतरनाक आणि भयानक भविष्यवाणी केली आहे. त्यांची ही भविष्यवाणी संपूर्ण जगाला धडकी भरवणारी अशी आहे.
बाबा वांगा यांनी 2023 या वर्षासाठी भविष्यवाणी लिहीली आहे. 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलणार असल्याचे भाकित . बाबा वांगा यांनी वर्तवले आहे.बाबा वांगा यांच्या अंदाजानुसार, नविन वर्ष अर्थात 2023 मध्ये पृथ्वीची कक्षेत लक्षणीय बदल होणार आहे. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये सर्वात मोठ्या खगोलीय घटनेची भविष्यवाणी देखील केली आहे.
पृथ्वीची कक्षा बदलल्याने त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे संपूर्ण जगावर संकट ओढावू शकते. याचा थेट जीव सृष्टीला धोका पोहचणार आहे.बाबा वांगा यांनी यापूर्वी 2004 मध्ये त्सुनामीची भविष्यवाणी (Prophecy) केली होती, जी खरी ठरली होती. यानंतर त्यांनी 2021 साठी भाकीत केलेले भाकित देखील खरे ठरले आहे.
टोळ किटकाचे थवे जगभरातील शेतांवर हल्ला करतील असे भाकित वर्तवले होते. त्यानुसार 2021 मध्ये भारतासह अनेक देशांत टोळांच्या हल्ल्यामुळे बरीच पिके उद्ध्वस्त झाली होती.बाबा वांगा यांनी पुढील अनेक वर्षांपर्यंतच्या भविष्यवाण्या वर्तवल्या आहेत. बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, अंतराळवीर 2028 मध्ये शुक्र ग्रहावर पाऊल टाकतील.
2046 मध्ये अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी पल्ला गाठेल. प्रत्यारोपणच्या मदतीने लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकतील असा दावा या भविष्यवाणीत करण्यात आला आहे.बाबा वांगा यांनीही जगाच्या अंताची भविष्यवाणी केली आहे. 5079 साली जगाचा अंत होईल अशी भविष्यवाणी (Prophecy) बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वीच करुन ठेवली आहे.
बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यापैकी अनेक खरे ठरल्या आहेत. बाबा वांगा यांनी मृत्यूपूर्वी 5079 पर्यंत भविष्यवाणी वर्तवली आहेत. बाबा वांगा यांच्या अंदाजांपैकी 85 टक्के पर्यंत भविष्यवाणी खरे ठरली आहे.
बाबा वांगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता आणि वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. बल्गेरियाचे रहिवासी असलेले बाबा वांगा हे फकीर होते. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. या सर्व भविष्यवाण्या लिहून ती कुठेही गेली नाही, तर मृत्यूपूर्वी त्यांनी त्यांच्या अनुयायांना या भविष्यवाण्या सांगून ठेवल्या आहेत.