इंधन (Fuel) दराचा भडका पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला जाणार असून महागाईची झळ आणखी तीव्र होणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. पन्नास रुपयांची वाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे.
निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
घरगुती गॅ (Fuel)स सिलेंडरच्या दरात मागील वर्षी ६ ऑक्टोबरला वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाल्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर काही दिवसांपूर्वी वाढवण्यात आले होते.
त्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी ९४९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये ९७६ तर चेन्नईत ९६५.५० रुपये एवढा दर झाला आहे. लखनौमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी ९८७.५० रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस | सिलेंडरच्या दराने १००० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर १०३९.५० रुपये झाला आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट बिघडणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार, भाज्या, धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता गॅस आणि इंधन (Fuel) दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे.
महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. देशातील सर्व महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोल ११०.८२ | रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.०० रुपये प्रतिलिटरवर गेले आहे.
त्याच तुलनेत दिल्लीत पेट्रोल ९६.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.४७ रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच देशाची राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोलचे दर तब्बल एका लिटरमागे तब्बल चौदा रुपयांनी महाग आहे. तसेच, डिझेलही तब्बल नऊ रुपयांनी महाग आहे. त्यामुळे राज्यातील वाहतुकदारांनाही याची झळ बसणार असून जीवनावश्यक वस्तूदेखील महागण्याची शक्यता आहे.