Wednesday, June 25, 2025

Bank सिलिकॉन व्हॅली बँकेमुळे भारतीय स्टार्टअप्स अडचणीत

अमेरिकेतील १६ व्या सर्वात मोठ्या बँकेच्या (Bank) डबघाईनंतर अंदाजे ६० भारतीय स्टार्टअप्स आता अडचणीत सापडले आहेत. कारण या बँकेत भारतीय स्टार्टअप्सचे अंदाजे ४०० कोटी रुपये अडकले आहेत. अमेरिकन सरकारने १३ मार्चपासून या बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. यामुळे भारतीय स्टार्टअप्सच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ४० स्टार्टअप्सचे २-८ कोटी तर २० स्टार्टअप्सचे ८ कोटींपेक्षा अधिक रक्रम बँकेत अडकली आहे. भांडवल अडकल्याने या स्टार्टअप्सचे अनेक प्रकल्पही अडचणीत आले आहेत.परिस्थिती पाहता, भारत सरकारने स्टार्टअप मालकांना पुढील आठवड्यात भेटण्यास सांगितले आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की पुढील आठवड्यात स्टार्टअप्सच्या मालकांची भेट घेऊन या परिस्थितीत त्यांना काय मदत करता येईल हे पाहिले जाईल. विशेष म्हणजे, बँकेतून (Bank) पैसे काढण्यावर बंदी कायम राहिल्यास भारतीय स्टार्ट अप्सना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यातही अडचणी येऊ शकतात.

हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 13-03-23

सुमारे १५ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन म्युच्युअल बुडाली होती. त्यानंर एसव्हीबी बँकेचे झालेले आर्थिक पतन हे सर्वात मोठे नुकसान मानले जात आहे.सिलिकॉन व्हॅली बँक अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत आहे. पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांच्या मते, सिलिकॉन व्हॅली बँक ही त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या संस्थांपैकी एक होती.

मात्र, आता पेटीएममध्ये त्यांची कोणतीही भागीदारी नाही. फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात घेतलेल्या आक्रमक दृष्टिकोनामुळे या बँकेला (Bank) मोठा फटका सहन करावा लागला. गेल्या वर्षभरापासून बँक आर्थिक दबावाशी झुंजत आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म