चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून पुढील तीन महिन्यात परिस्थितीत आणखी बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झाले असून राज्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.कोरोना विषाणूने (infection) चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
यासोबतच मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. रुग्णालये भरली जात आहेत. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत चीनमधील परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन महिन्यांत चीनच्या ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण होऊ शकते, त्यासोबत लाखो लोकांचा मृत्यूही होऊ शकतो.
एपिडेमियोलॉजिस्ट आणि आरोग्य (infection) अर्थशास्त्रज्ञ एरिक फीगल-डिंग यांनी ट्विटर थ्रेडमध्ये सांगितले की, निर्बंध उठवल्यानंतर चीनमधील रुग्णालये पूर्णपणे भरून गेली आहेत, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. एपिडेमियोलॉजिस्टचा अंदाज आहे की पुढील ९० दिवसांत चीनच्या ६० टक्के आणि जगातील १० टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या लाखोंच्या घरात असू शकते.
हे वाचा कर्नाटकचा पुनरुच्चार, ‘महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही’
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून नवीन प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य (infection) मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री देशातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती आणि तयारी याबाबत आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.
अलीकडच्या काळात शेजारील चीन व्यतिरिक्त अमेरिका, जपान, कोरिया आणि ब्राझीलमध्ये कोविड-१९ संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढली आहेत. याबाबत केंद्र सरकारही अलर्ट मोडमध्ये आले असून सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.सध्या देशात आठवड्यात संसर्गाची (infection) सुमारे १,२०० प्रकरणे नोंदवली जात आहेत. भूषण म्हणाले, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि चीनमधील प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ झाल्याने भारत सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने राज्यांना इशारा दिला आहे की कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही.