आज, १ फेब्रुवारी, सोन्याच्या (Jewellers) किमतीत किंचित घट झाली आहे. चांदीच्या दरातही थोडीशी घसरण दिसून आली. सलग दोन दिवस सोन्याच्या तसेच चांदीच्या किंमतींमध्ये घट दिसत आहे. मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ चा हा परिणाम आहे का? पहा आजचे दरसोन्या-चांदीचे दर रोज बदलत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी सुरू आहे. मात्र, बऱ्याच हालचालींनंतर सोने गेल्या १५ दिवसांपासून स्थिर होते. आता मोदी सरकारच्या निर्मला सीतारामन यांच्या २०२३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच त्याच्या किमती थोड्या कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल.
तर जाणून घ्या आजचे दरइंडियन बुलियन अँड ज्वेलर्स (Jewellers) असोसिएशनने जाहीर केलेल्या सोन्याच्या दरानुसार सोमवारी संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५७,४२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. त्या आधीच्या सत्रात सोन्याच्या किंमती अंदाजे ५७,४३० रुपये प्रती तोळा होत्या, त्यातुलनेत सोन्याच्या किंमतीत आज अंदाजे १० रुपयांची घट झाली आहे.
हे वाचा : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? जाणून घ्या??
तर २२ कॅरेटसाठी आजचा दर ५२६४० रुपये प्रती तोळा आहे.म काल हा दर अंदाजे ५२६५० रुपये प्रती तोळा होता.दुसरीकडे, मंगळवारी चांदीचा दर ७२३०० रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. त्या आधीच्या दिवशी सोमवारीही चांदीच्या किंमती कायम होत्या. त्यात कोणताही बदल झालेला नाही.
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही यंत्रणा मध्यवर्ती आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये (Jewellers) मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री करतो.












