जगभरात हॉरर चित्रपटांची (movies) आवड असणारा एक वेगळाच गट आहे. अनेकांना थरारपट बघायला आवडतात. विशेषकरून थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर आणि मोठ्या आवाजात हे हॉरर चित्रपट पाहण्याची एक वेगळीच मजा असते. मात्र एक असा हॉरर चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, जो पाहिल्यानंतर भल्याभल्यांची तब्येत बिघडली आहे.
काहींना पॅनिक अटॅक्स येत आहेत, तर काही जण चक्क उल्टी करण्यासाठी थिएटरबाहेर जात आहेत. यावरून हा चित्रपट किती भयानक असावा, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या चित्रपटाचं नाव आहे ‘द आऊटवॉटर्स’.‘द आऊटवॉटर्स’ या चित्रपटाने प्रेक्षकांना इतकं बेचैन केलंय की काही जण चित्रपट पाहता पाहताच आजारी पडले आहेत.
तर काही प्रेक्षक अर्ध्यावरूनच थिएटरमधून बाहेर पळून आले. या चित्रपटाची (movies) दहशत इतकी आहे की काही प्रेक्षकांना त्यांच्या मनगटावरील स्मार्ट वॉच बंद करावी लागली. कारण वाढलेली हार्ट रेट त्यावर दिसू लागली आणि त्यामुळे प्रेक्षकांना पॅनिक अटॅक येऊ लागला.
काय आहे चित्रपटाची कथा?
द आऊटवॉटर्स या चित्रपटात चार मित्रांचा एक ग्रुप मोझावे वाळवंटात एक म्युझिक व्हिडीओ बनवण्यासाठी जातात. मात्र त्याआधीच काही विचित्र घटना घडू लागतात. मेमरी कार्डद्वारे मिळालेल्या फुटेजद्वारे या घटनेला दाखवलं जातं. रॉबी बॅनफिचने हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट (movies) पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.












