केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाईचा झटका देण्याची तयारी करत आहे. यावेळी रस्त्यावर वाहन चालवणे महाग होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अंमलबजावणी युनिट एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोल (Toll) टॅक्स वाढवण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत १ एप्रिलपासून टोल दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ करू शकते. म्हणजेच, राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर तुमचे वाहन चालवणे महाग होणार आहे.
विशेष म्हणजे एक्स्प्रेस वेवर सध्या २.२९ रुपये प्रति किलोमीटर दराने टोल टॅक्स वसूल केला जात आहे. आता त्यात २० टक्के वाढ करण्यात येणार आहे. सुधारित टोल (Toll) दरांचा प्रस्ताव २५ मार्चपर्यंत सर्व PIUs कडून पाठवला जाईल. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर १ एप्रिलपासून त्यांची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. कार आणि हलक्या वाहनासाठी टोल दरात ५ टक्के वाढ, अवजड वाहनांसाठी टोल टॅक्स १० टक्क्यांनी वाढू शकतो.
राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरून प्रवास करणा-या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून १ एप्रिलपासून टोलचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोलचे दर ५ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ नुसार शुल्क दर दरवर्षी १ एप्रिलपासून सुधारित केले जातील.
हे वाचा : गौतमीच्या एका कार्यक्रमाची सुपारी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का?
विशिष्ट टोल (Toll) मुद्यावर वेळोवेळी आवश्यकतेनुसार धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रस्तावांवर विचार करेल आणि योग्य विचार केल्यानंतर दरांना मंजुरी देऊ शकेल. अहवालात पुढे म्हटले आहे की कार आणि हलक्या वाहनांसाठी टोलचे दर पाच टक्क्यांनी आणि इतर अवजड वाहनांसाठी १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या दिल्ली- मुंबई एक्स्प्रेस वेवरही टोलचे दर वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या एक्स्प्रेस वेवर दररोज सुमारे २० हजार वाहने ये-जा करत असून, येत्या सहा महिन्यांत त्यांची संख्या ५० ते ६० हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.