Saturday, June 21, 2025

wildlife : कामावरुन येऊन झोपला, पण काहीच वेळात धक्कादायक घडलं

साप (wildlife) समोर दिसला किंवा त्याचं नावही ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. कारण हा लहान जीव अगदी काही मिनिटांमध्येच एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र, अनेकदा अचानक आपल्यासोबत अशा काही घटना घडतात, ज्या थरकाप उडवणाऱ्या असतात.

अशीच एक घटना आता मावळातून समोर आली आहे. ज्यात विषारी नाग एका व्यक्तीच्या छातीवर पडला.वातावरणाचा फटका वन्यजीवांनाही (wildlife) बसू लागला आहे. दोन दिवसांपासून मावळात उकाडा जाणवू लागलाय. त्यामुळे सरपटणारे वन्यजीव सैरभैर होत असल्याचं आंबी एमआयडीसीतील कामगार वस्तीत दिसून आलं.

हे वाचा : पेट्रोल डिझेल होणार इतक्या रुपयांनी स्वस्त?

याठिकाणी एक थरकाप उडवणारी घटना घडली.कामावरून घरी आलेला कामगार नुकताच जमिनीवर आडवा पडला होता. इतक्यात त्याच्या छातीवर विषारी नाग पडला. या नागाला पाहताच कामगार घाबरून गेला. वेळ न घालवता त्याने लगेच त्याच्या हाताजवळ असलेला मोबाईल घेतला आणि त्यावरुन त्याने सहकाऱ्याला याबाबत माहिती दिली.

यानंतर वन्यजीव (wildlife) रक्षक मावळच्या सर्प मित्रांनी या नागाला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिलं.सुदैवाने छातीवर पडूनही या नागाने कामगाराला चावा घेतला नाही. त्यामुळे या घटनेत मोठा अनर्थ टळला. मात्र, ही घटना थरकाप उडवणारी होती.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म