आज ‘विंटर सोल्सटिस’ (Winter Solstice) हा दिवस आहे. विंटर सोल्सटिस म्हणजे या वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र आहे. आज तुमचा दिवस हा केवळ 10 तास 41 मिनिटांचा आणि रात्र तब्ब्ल 13 तास 19 मिनिटांची असणार आहे. दरम्यान, तुम्ही कोणत्या देशात, किंवा शहरात आहात, यावरुनही दिवस आणि रात्र किती वेळ असणार हे ठरणार आहे.
22 डिसेंबर 2022 रोजी, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्य मकर राशीच्या उष्ण कटिबंधावर असतो. यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. मध्य भारताबद्दल बोलायचं झालं तर तिथे सूर्योदय सकाळी 7.05 वाजता होईल. तर, सूर्यास्त संध्याकाळी 5.46 वाजता होईल. म्हणजे दिवसाची वेळ 10 तास 41 मिनिटं असणार आहे, तर रात्रीची वेळ 13 तास 19 मिनिटं असेल.
हे वाचा : भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची ‘ही’ लक्षणं दिसताच सावध व्हा!
या दिवशी (Winter Solstice) सूर्यप्रकाशाचा कोन 23 अंश 26 मिनिटं 17 सेकंद दक्षिणेकडे असेल. पुढील वर्षी 21 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असेल, त्यावेळी दिवस आणि रात्र समान वेळेची असेल. या इंग्रजीत Winter Solstice म्हणतात. Solstice हा लॅटिन शब्द आहे, जो Solstim वरून आला आहे.
लॅटिन शब्द सोलचा अर्थ सूर्य असा होतो, तर सेस्टेअरचा अर्थ स्थिर राहणं. या दोन शब्दांना एकत्र करून सॉल्सटिस हा शब्द तयार झाला आहे, ज्याचा अर्थ सूर्याचं स्थिर राहणं असा होतो. या नैसर्गिक बदलांमुळे 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते.
इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील 23.5 अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणं एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात. त्यामुळेच, विंटर सॉल्सटिसच्या (Winter Solstice) वेळी दक्षिण गोलार्धात विंटर सॉल्सटिस जास्त सूर्यप्रकाश असतो.