Thursday, April 24, 2025

expensive : सकाळी इच्छा नसताना लवकर उठणे पडू शकते महागात!

आपण नेहमी ऐकतो कि जी व्यक्ती सकाळी लवकर उठते त्या व्यक्तिचे आरोग्य सुदृढ  राहते. बरीच कामं अशी आहेत जी आपण सकाळी लवकर उठुनच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण, सर्वांनाच सकाळी लवकर उठायला जमते असे नाही. यावर आरोग्य तज्ज्ञ सांगतात की जर एखादी व्यक्ती इच्छा (expensive) नसूनही सकाळी लवकर उठत असेल तर त्यांना बऱ्याचशा समस्यांचा सामना करावा लागतो.

तज्ज्ञांच्या मते एखादी व्यक्ती इच्छा नसूनही सकाळी लवकर उठत असेल तर त्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. सकाळी जबरदस्ती उठल्याने सिर्केडियन क्लॉक म्हणजेच आपल्या शरीराची जैविक घडी बिघडते आणि यामुळे आपला दिवसभराच्या कार्यपद्धतीवर याचा परिणाम होतो.

हे वाचा : अंत्यसंस्कार होणार तोच मृत तरुण चक्क झाला जिवंत

जर तुम्ही इच्छा (expensive) नसूनही सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करत असाल तर दिवसभर तुम्हाला आळस जाणवेल व कोणत्याही कामात तुमचे मन लागणार नाही, शरीरासोबत मनही थकलेले राहिल ज्यामुळे तुम्ही कोणतेच काम व्यवस्थित करु शकणार नाही यामुळे तुमची तब्येत खराब  होईल.

सकाळी लवकर उठणे किंवा रात्री उशिरा झोपणे ही सवय आपल्या DNA मध्ये असते. जर तुम्ही सकाळी जबरदस्ती लवकर उठत असाल तर तुमच्या वजनावर याचा फरक पडेल, वजन कमी होऊ लागेल. साधारणत: 20 वर्षाच्या मुला-मुलींना रात्री उशिरा पर्यंत जागण्याची सवय असते तर या उलट काही मुलं सकाळी लवकर उठतात आणि मग म्हातारपणात लोक आपली दिनचर्या बदलतात. थोडक्यात या झोपण्या- उठण्याच्या सवयींचा तुमच्या आरोग्यावरही (Health) थेट परिणाम होत असतो.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म