उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळी हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात. निरोगी केसांसाठी तेल लावणे (Hair Oil) हा दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: उन्हाळ्यात केसांसाठी योग्य तेल वापरणे महत्त्वाचे ठरते. केसांना चांगले पोषण मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या नैसर्गिक तेलांचा वापर करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यातही केस मऊ रेशमी राहण्यास (Hair Oil) मदत होते.
उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करण्यासोबतच ते आकर्षक आणि सुंदर ठेवणं तसं आव्हानात्मक काम आहे. आज आपण केसांसाठी काही परफेक्ट हेअर ऑइलविषयी माहिती घेणार आहोत, ज्याचा वापर करून आपण केसांची योग्य काळजी घेऊ शकता.
हे वाचा IPL : कॅप्टन झाल्यानंतर रवींद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…..
खोबरेल तेल
त्वचेला ओलावा देण्यापासून ते केस निरोगी राहण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. आपल्याकडे जवळजवळ प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या हे तेल वापरतो. कारण उन्हाळ्यात खोबरेल तेल लावणे खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेलाच्या कूलिंग इफेक्टमुळे केसांचे उष्णतेपासून संरक्षण होते. यासोबतच केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणाची समस्याही कमी होते.
जोजोबा तेल
जोजोबा तेल कोरड्या, निर्जीव आणि खराब झालेल्या केसांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांच्या सर्व समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. विशेष म्हणजे जोजोबा तेलामुळे केस चिकट दिसत नाहीत.
बदामाचे तेल
व्हिटॅमिन ई च्या गुणधर्मांनी समृद्ध बदाम तेल केसांसाठी उत्कृष्ट क्लींजिंग एजंट आहे. केसांमधील घाण साफ करण्यास आणि त्यांना पोषण देण्यास फायदेशीर तेल आहे. दुसरीकडे केसांच्या वाढीसाठी बदामाचे तेल खूप प्रभावी आहे.
ऑलिव्ह ऑइल
आरोग्यासोबत ऑलिव्ह ऑईल केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केसगळतीने त्रस्त असाल आणि तुमचे केस खूप कोरडे असतील तर ऑलिव्ह ऑईल तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ऑलिव्ह ऑईल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
एवोकॅडो तेल
एवोकॅडो तेल जीवनसत्त्वे ए, बी, डी आणि व्हिटॅमिन ई तसेच लोह, अमीनो अॅसिड आणि फॉलिक अॅसिडचा चांगला स्रोत मानला जातो. जे केसांचे उन्हापासून संरक्षण करून नैसर्गिक कंडिशनरचे काम करते. एवोकॅडो हेअर ऑइल नियमित लावल्याने केस रेशमी, चमकदार आणि मजबूत होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. स्मार्ट इंडिया त्याची हमी देत नाही.)












