अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल, की सध्या भूकच (Health) लागत नाही. जेव्हा लागते तेव्हा जास्त खावं वाटत नाही. ही समस्याच आजच्या धावपळीच्या काळात अनेकांमध्ये दिसते.तुम्हालाही जाणवते का ही समस्या? यात भूक संपते. मग अशक्तपणाही जाणवू लागतो. जाणून घ्या यावर मात करण्याचे काही घरगुती उपाय.
यातून भूक नक्कीच वाढेल. त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. याला मुख्यतः बद्धकोष्ठता दूर करण्यास वापरलं जातं. तुम्हाला वेळेवर भूक लागत नसल्यास त्रिफळा चूर्ण वापरा.
हलक्या गरम दुधात एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून घ्या. हे नियमित घेतल्याने भूक वाढते. ग्रीन टी (Health) घ्या ग्रीन टी भूक वाढवण्यास प्रभावी आहे. याच्या नियमित सेवनाने केवळ भूक वाढते असे नाही तर अनेक आजारांमध्ये आराम मिळतो.
तुम्हाला सकाळ-संध्याकाळ चहा आवडत असल्यास इतर कुठला चहा पिण्याऐवजी ग्रीन टी घ्या.लिंबू पाणी उन्हाळा असो, की हिवाळा, पाणी भरपूर पिलं पाहिजे. शरीराला प्रत्येक ऋतूत पाण्याची गरज असते. लिंबू पाणीही घेतलं पाहिजे. यानं भूक वाढते.
शिवाय शरीरातील पाण्याची (Health) कमतरताही भरून निघते. ओवा ओवा खाल्ल्यानं पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. अपचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येत ओवा खाऊ शकता. यानं पोटही साफ राहतं.
याला हलकं भाजून यात मीठ टाकून खा. दिवसातून दोन वेळा खाऊ शकता.ज्यूस तुम्हाला भूक लागत नसल्यास आणि काहीच खावं वाटत नसल्यास ज्यूस पिऊ शकता. ज्यूस पिताना यात थोडं मीठ किंवा काळं मीठ टाका.यानं पोट साफ राहील आणि भूकही लागेल.