वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या चालींना विशेष महत्त्व आहे. त्यानुसार, सर्व ग्रहांचा (zodiac) सेनापती मानला जाणारा मंगळ हा भूमी, ऊर्जा, अहंकार, आत्मविश्वास, सामर्थ्य, क्रोध आणि शौर्य या गुणांचा कारक आहे. त्याच्या राशी आणि नक्षत्र बदलाचे परिणाम सर्व राशींवर होतात.
पण येत्या काही दिवसांत होणारा मंगळाचा नक्षत्र बदल काही राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, 18 फेब्रुवारीला मंगळ श्रवण नक्षत्रात प्रवेश करण्यानं कोणत्या राशींना धन, यश आणि सुख लाभणार आहे…
1. मकर राशी: मकर राशीवर (zodiac) मंगळाची कृपा सदैव असते. पण येत्या काही दिवसांत त्यांच्यासाठी अतिशय शुभ योग निर्माण होत आहे. मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधींचा लाभ होईल. जर कोणी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी हा चांगला मुहूर्त आहे. आर्थिक क्षेत्रातही चांगली प्रगती होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात विस्तार होऊ शकतो आणि सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल.
2. धनु राशी: मंगळाच्या नक्षत्र बदलाचा सकारात्मक परिणाम धनु राशीवरही दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी हा काळ सुखदायक राहील. नोकरीमध्ये बढती आणि स्थानबदलाची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल. मन प्रसन्न राहील आणि कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल.
3. कर्क राशी: कर्क राशीवर (zodiac) मंगळाची विशेष कृपा राहील. राजकारणात करिअर करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ आहे. अचानकपणे एखाद्या मोठ्या नेत्याची भेट होऊ शकते, जी भविष्यात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आर्थिक क्षेत्रातही चांगली प्रगती होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि अडचणी दूर होऊन यश प्राप्त होईल.
(टीप : वरील सर्व माहिती स्मार्ट इंडिया केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून स्मार्ट इंडिया कोणताही दावा करत नाही.)