शहरातील आसरानगर येथे कचरा डेपोला मोठी आग (fire) लागली यामुळे सांगली नाका, शिक्षक कॉलनी, आसरानगर, वृंदावन कॉलनी, सुरभी कॉलनी, निशिगंध हौसिंग सोसायटी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.
शहरातील दैनंदिन जमा होणारा कचरा या मैलखड्ड्यावर नेऊन टाकला जातो. याठिकाणी वारंवार आग लागण्याच्या घटनेने धुराचे लोट निर्माण होऊन भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या संदर्भात भागातील नागरिकांनी मोर्चे, आंदोलनाद्वारे लेखी-तोंडी स्वरुपात तक्रारी दिल्या आहेत.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 23-11-22
मात्र त्याकडे तत्कालीन नगरपालिकेसह विद्यमान महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात आहे.धुरामुळे लहान मुलांपासून वयोवृध्दांपर्यंत श्वसनाचे व दम्याचे विकार जडत आहेत. कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात आगीचे (fire) लोळ दिसू लागले. कचर्यामुळे आग फैलावत चालल्याने अखेर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
जवानांनी तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग (fire) आटोक्यात आणली. मात्र निर्माण झालेल्या धुराच्या लोटामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत बेजबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, शहराध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव वसंत कोरवी, रावसो पाटील, अब्दुल बसताडे, श्रीपाल दरिबे, मनोज पाटील, आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.












