इचलकरंजी येथील गणेश नगर मध्ये पोलिस पथकाच्या वाहनाखाली (police vehicle) सापडुन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. राज सुरेश चव्हाण (रा. गणेशनगर) असे मृताचे नांव आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी गणेशनगर परिसरात आज दुपारी रेल्वे पोलिसांचे पथक एका प्रकरणातील वॉरंटच्या पार्श्वभूमीवर एकास शोधण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपले चारचाकी वाहन (क्र. एमएच 09 सीएम 0422) हे गणेश मंदिर परिसरात लावले होते. यावेळी मंदिरासमोरच्या जागेत राज चव्हाण हा मित्रांसमवेत खेळत होता.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 04-12-22
त्याचवेळी अचानकपणे सदरचे वाहन (police vehicle) घसरतीमुळे पुढे गेले व त्याची राज चव्हाण याला जोरदार धडक बसली. त्यामध्ये राज हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी सांगितले.
राज चव्हाण याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. घटनास्थळ व रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. याया प्रकरणी अशोक प्रकाश चव्हाण (वय 36 रा. गणेशनगर) यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार सुर्यकांत आप्पासो कांबळे (रा. भारतमाता हौसिंग सोसायटी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.