Saturday, June 21, 2025

इचलकरंजी तिसर्‍या मजल्यावरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या

इचलकरंजी  येथील महानगरपालिका मालकीच्या शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन एका युवकाने आत्महत्या केली. या प्रकरणी वर्दी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी गावभाग पोलिसात दिली आहे. दरम्यान, युवकाची ओळख पटविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते..

येथील मध्यवर्ती चौकात महापालिकेच्या मालकीची शॉपिंग सेंटरची इमारत आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एका युवकाने. उडी मारली. तो इमारतीच्या पिछाडीस असलेल्या शिवाजी उद्यानात पडल्याने त्याचा आवाज ऐकून तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिकेला कळवून गंभीर अवस्थेतील युवकाला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्या युवकाचा काही वेळेतच मृत्यू झाला.

हा युवक 20 ते 22 वर्षाचा असून तिसऱ्या मजल्यावर त्याची चप्पलही मिळून आली आहे. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याच्या नाका- तोंडातून व कानातून रक्त आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटण्यासारखे काहीच त्याच्याकडे • मिळून आलेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. युवकाच्या संदर्भात कोणाला माहिती असल्यास गावभाग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म