मागील वर्षभरापासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असतानाच मंगळवारी पाटबंधारे विभागाने थकीत ९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी इचलकरंजी शहराची तहान भागविणाऱ्या कृष्णा नळपाणी (Water) पुरवठा योजनेचा पाणी उपसा बंद केला आहे. त्यामुळे शहरवासियांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. तर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
शहराला सध्या कृष्णा आणि पंचगंगा या दोन योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र कृष्णा योजना गळतीच्या आणि पंचगंगा प्रदुषणाच्या गर्तेत अडकल्याने शहरवासियांना मुबलक व शुध्द पाणी पुरवठा होतच नाही. जितका उपसा केला जातो त्यापेक्षाही अत्यंत कमी पाणी (Water) मिळत असल्याने पाण्याचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे.
त्यातच कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने मागील वर्षभरापासून शहरात आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. पर्यायी कट्टीमोळा डोह येथून योजना राबवून पाणी पुरवठा केला जाणार होता. पण तोसुध्दा तांत्रिक कारणांमुळे फसला आहे. कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सतत गळती लागत असल्याने पाणी (Water) उपसा खंडीत करावा
लागतो. मागील आठवड्यात दोन मोठ्या गळतीमुळे आणि नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील पाणी पुरवठा कोलमडून गेल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच पाटबंधारे विभागाने कृष्णा योजनेचा पाणी उपसा बंद केल्याने भर पडली आहे.
कृष्णेतून पाणी उपसापोटी नगरपालिकेकडून ९ कोटी रुपये देणे बाकी आहे. यापोटी ३१ मार्चपर्यंत नगरपालिकेने १ कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी ३० लाख रुपये दिले असून उर्वरीत ७० लाख रुपये मार्चअखेरपर्यंत देण्याचे नियोजन मुरु आहे. मात्र पाटबंधारे विभागाकडून १ कोटी रुपयाची मागणी करून त्याची पूर्तता न केल्याने मंगळवारी दुपारी मजरेवाडी येथील पाणी (Water) उपसा बंद केला आहे.