शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी (Stormy) पावसामुळे महावितरणचे सुमारे ७५ लाखाचे नुकसान झाले आहे. तथापि अनेक भागात बंद पडलेला वीज पुरवठा युध्द पातळीवर सुरळीत करण्यात आला आहे.शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगलीचे अधीक्षक अभियंता -अंकुर कावळे यांनी तातडीने इचलकरंजी शहराला आवश्यक साहित्य पुरवण्याचे -आदेश दिले आहेत. त्यानुसार साहित्य प्राप्त झाल्यानंतर पोल उभारणी करणेसह -अन्य कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी दिली.
अनेक भागात छतावरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. याशिवाय शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी मोठमोठ्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याने वाहिन्या तसेच पोल वाकले, मोडले गेले. काही भागात पोल जमीनदोस्त झाले त्याचबरोबर ट्रान्सफर्मार बंद पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय शहराबाहेर अनेक ठिकाणचे मोठमोठे फ्लेक्स बोर्ड कोसळले होते.
सांगली रोड, शहापूर तसेच यड्राव भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. शहर व परिसरात सुमारे १२५ पोल पडले असून अनेक ठिकाणी वाहिन्या तुटल्यामुळे १६ पैकी १२ वीज उपकेंद्रे बंद पडली होती. याशिवाय एका भागात मोबाईल टॉवर कोसळल्यामुळे वाहिनीचे मोठे नुकसान झाले आहे. दोन ठिकाणी ट्रान्स्फार्मर तर आठ | ठिकाणी पावसामुळे रोहित्र खराब झाले होते.
मात्र पाऊस (Stormy) थांबल्यावर महावितरणच्या २५० कर्मचाऱ्यांसह इतर अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुरवठा खंडीत झालेल्या भागात तसेच तक्रारी प्राप्त झालेल्या भागात धाव घेऊन युद्ध पातळीवर दुरुस्ती मोहिम | राबविण्यात आली. वाहिन्या तुटल्यामुळे बंद पडलेली ३३/११ केव्हीएची १२ उपकेंद्र तातडीने सुरू करण्यात आली. यामुळे शहरातील | वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. काही भागात पडलेले पोल येत्या दोन दिवसात उभारण्यात येणार आहेत.