हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (political) एका कार्यक्रमासाठी गेलो असता माझ्यासोबत पोटतिडकीने काम केलेल्या आमच्याच जुन्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात वादावादी झाली. मात्र मला कोणत्या राजकीय वादात पडायचं नाही आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच माझा अजेंडा असून कितीही विरोध झाला तरी मी काम करत राहणार आहे. त्यामुळे मी पोलिसांना देखील कार्यकर्त्यांवर कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
इचलकरंजी मधील चंदूर येथे बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील (political) माने यांची गाडी अडवून गद्दारी का केली? असा जाब विचारला. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूलाकरून खासदार मानेंच्या गाडीला मार्गस्थ केले.
हे वाचा : SBI ची जबरदस्त स्कीम, ४०० दिवसांसाठी FD करा आणि मिळवा भरपूर व्याज!
यावर प्रतिक्रिया देताना खासदार माने यांनी माझा अजेंडा विकासाकाम करणे असून कितीही विरोध झाला तरी मी काम करत राहणार असे सांगितले. माझी गाडी अडवून आमच्याच जुन्या कार्यकर्त्यांनी माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी ही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी खाली उतरलो होतो.
यावेळी काही पोलिसांनी त्यांना बाजूला केल्याने वाद निर्माण झाला. परंतु मला वादात पडायचे नाही.राज्य व केंद्र सरकारच्या (political) माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास करणे माझा अजेंडा असून मी काम करत राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार माने यांनी दिली आहे.