इचलकरंजी शहर आणि परिसरात गुरुवारी परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ढगफुटी सदृश्य पावसाने (Rain) सलग चार तासापेक्षा अधिककाळ हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली तर गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावरुन वाहू लागल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते.
तर काही भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने ऑक्टोबर हिट पहिल्याच आठवड्यापासून जाणवू लागली होती. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक हैराण झाले होते. गुरुवारी सकाळपासून कडकडीत ऊन पडले होते.
हे वाचा :- जाणून घ्या आजचे राशिभविष्य दि : 07-10-2022
तर दुपारी तीननंतर अचानकपणे मेघ दाटून आले आणि पावसाने (Rain) हजेरी लावली. प्रारंभी काही भागात पावसाची सुरुवात झाली तर अनेक भागात पावसाचा मागमुसही नव्हता. मात्र पाच वाजता ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडटासह वरुणराजाने जोरदारपणे बरसण्यास सुरुवात केली.
जोरदार पावसामुळे (Rain) अनेक मुख्य रस्त्यांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर अनेक ठिकाणी गटारी तुडूंब भरुन सांडपाणी रस्त्यावरुन वाहू लागल्याने गटारीतील घाण रस्त्यावर आली होती. शहरातील श्रीपादनगर परिसरात अनेक भागातील पाणी गटारीच्या माध्यमातून येत असल्याने या परिसरात मोठे तळे निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी गटारीचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली होती.