येथील गावभाग परिसरातील ४५ वर्षीय विवाहीतेने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अंजुम मौला मुजावर असे त्या महिलेचे नाव आहे. सुमारे २ तास नदीतील जलपर्णी हटवल्यावर त्या महिलेचा मृतदेह मिळून आला. येथील गावभाग परिसरात राहणाऱ्या अंजुम मुजावर यांच्या कुटुंबासमवेत राहतात.
अंजू या मानसिक आजारी होत्या. सोमवारी दुपारच्या सुमारास पंचगंगा नदीच्या दिशेने चालत गेल्या होत्या. थोड्याच वेळात लहान पुलावरून महिलेने उडी घेतल्याची वार्ता नदीवेस नाका परिसरात पसरली. त्यामुळे गावभागचे पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार, शिवाजीनगरचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस पथक आणि आपत्कालीन मदत विभागाच्या पथकानेही नदीकडे धाव घेतली.
हे वाचा : मुख्यमंत्री शिंदेना जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
मुजावर यांच्या नातेवाईकांनी पुलावर धाव घेतली असता चप्पल आणि नागरीकांनी केलेल्या महिलेच्या वर्णनानवरून नदीत उडी घेतलेली महिला अंजुम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नदीत महिलेची शोध मोहिम सुरु झाली. नदीत मोठ्याप्रमाणात जलपर्णी वाढल्याने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने सुमारे २ तास जलपर्णी हटवल्यावर मुजावर यांचा मृतदेह मिळून आला.