Sunday, April 20, 2025

Lifestyle Tips रोज पाळा ‘हे’ नियम, पोटाची चरबी होईल दूर

खराब दिनचर्या, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी , अती आराम आणि तणाव यामुळेल ठ्ठपणा वाढतो, जी आजकाल मोठी समस्या बनली आहे.एका रिपोर्टनुसार, प्रत्येक चौथी व्यक्ती ही लठ्ठपणामुळे त्रस्त असते. हा एक अनुवांशिक आजार (Lifestyle Tips) असून तो पिढ्यानपिढ्या चालत राहतो.

एकदा तुमचं वजन वाढलं तर त्यावर नियंत्रण ठेवणं सोपं रहात नाही. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्यासाठी जीवनशैली आणि आहार या दोन्ही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. तसेच जंक फूडचे सेवन करणेही टाळले पाहिजे. जंक फूड हे उशिरा पचते, तसेच त्यामध्ये फॅट्सचे (चरबी) प्रमाण जास्त असते.

यामुळे आपले वजन आणि कोलेस्ट्रॉलही वाढते. खराब कोलेस्ट्रॉल (Lifestyle Tips) वाढल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय लठ्ठपणामुळे इतरही अनेक आजार होऊ शकतात.तुम्हीही वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर रोज या नियमांचे पालन करावे.

हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 05-12-22

खूप पाणी प्यावे

चांगले आरोग्य हवे असेल तर रोज कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे, असा सल्ला देतात आरोग्य तज्ज्ञ देतात. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते तसेच मेटाबॉलिज्मही वाढते. मेटाबॉलिज्म वाढल्यामुळे पचन संस्थेचे कार्य चांगले होते.

जंक फूड टाळा

आजकाल बरेच लोक जंक फूडवर खूप अवलंबून असतात. तुम्हीही जंक फूडचं सेवन जास्त करत असाल, तर त्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. जंक फूडमध्ये चरबी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ते खाणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही ताज्या फळांचे सेवन करू शकता.

फायबरयुक्त पदार्थ खा

आरोग्य तज्ञांच्या सांगण्यानुसार (Lifestyle Tips), आहारात फायबरयुक्त पदार्थ खाल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. फायबर हे उशिरा पचते तसेच पचनसंस्था देखील सक्रिय राहते. त्यासाठी आहारात बार्ली, गहू, फळे, भाज्या, बीन्स आणि मटार इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

वेळेवर जेवावे

एका ठराविक वेळी जेवल्यानंतर पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित होते. तसेच कॅलरी जळण्यास देखील मदत होते. अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे अनेक आजार होऊ शकतात. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर रोज एका ठराविक वेळेत जेवण्याची सवय लावावी.

व्यायाम करा
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याची केला पाहिजे, असा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. शरीरात चरबी जमा झाल्यामुळे वजन वाढतं. त्यासाठी कॅलरीज बर्न करणं अत्यावश्यक आहे. वाढते वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर रोज व्यायाम केला पाहिजे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म