Sunday, April 20, 2025

Google वर सर्वाधिक जास्त कोणते आजार आणि उपचार सर्च केले गेले, पाहा!

2022 च्या सुरुवातीला भारतासह जगभरात कोरोनाचा  धोका होता. या काळात लोकं त्यांच्या आरोग्याबाबत फार सजग होते. अगदी साधं खोकला आणि सर्दीसाठी लोकांना सतर्कता दाखवली. यावेळी मदत व्हावी म्हणून अनेकांनी Google ची देखील मदत घेतली. कोरोनाच्या काळात देखील अनेकांनी Google वर आजारांची लक्षणं  सर्च केली होती. तर 2022 मध्ये लोकांनी गुगलवर कोणकोणते आजार आणि घरगुती उपचार शोधले आहे, ते पाहूयात

साल 2022 मध्ये आरोग्य आणि आजारांसंबंधी या गोष्टी सर्च केल्या गेल्या..

2021 हे संपूर्ण लकडाऊनमध्ये गेलं. अधिकतर लोकांनी जास्त वेळ हा घरी आराम आणि काम करून घालवला. सततचा आराम आणि खाण्यामुळे लठ्ठपणाची समस्या अनेकांना जाणवली. त्यामुळे कदाचित 2022 मध्ये लोकांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठीते घरगुती उपाय गुगलवर अधिक सर्च केले. यामध्ये किचनमधील कोणते मसाले तसंच पदार्थ वजन कमी करतात, हे सर्च केलं गेलं.

हे वाचा स्वयंपाकघरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह; धक्कादायक माहिती समोर

कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकजण त्याच्या इम्युनिटीच्या बाबतीत विचार करू लागले. त्यामुळे लोकांनी यावर्षी देखील इम्युनिटी कशी वाढवावी, त्यासाठी कोणती फळं खावीत याबाबत अधिक सर्च केलं आहे. कोरोनामुळे लोकं सर्दी-खोकल्याला देखील कोविड 19 समजत होते. त्यासाठीच 2022 मध्ये लोकांनी सर्दी-खोकल्यापासून आराम मिळावा तसंच घशाची खवखव दूर करणाऱ्या उपायांसंदर्भात सर्च केलं.

2022 मध्ये लोकांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी तसंत शरीर हेल्दी ठेवण्यासाठी दूध आणि हळदीचं सेवन कसं करावं, तुळशीचा काढा कसा तयार करावा, तुळशीचं पाणी आणि काळ्या मिरीचा काढा या रेसिपी अधिक प्रमाणात इंटरनेटवर सर्च केल्या.2022 मध्ये काही प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव थोडा कमी दिसून आला. मात्र तरीही हा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी यावर काय-काय उपाय करता येतील, याबाबत सर्च केलं आहे. या सर्व गोष्टींसाठी नागरिकांनी गूगलची मदत घेतली आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म