Saturday, August 23, 2025

Payment : उधार दिलेले पैसे जर परत मिळत नसतील तर.. पैसे बुडवणारा स्वतः घरी येऊन पैसे परत करेल.. फक्त “हे” एक काम करा..!!

या दुनियेत पैसे (Payment ) घेताना गोड बोलणारे एकदा पैसे घेतल्यानंतर आपला फोन सुद्धा उचलत नसतात. बऱ्याचदा काही अडचणींच्या वेळी आपण एकमेकांना मदत करतो. ही मदत आर्थिक स्वरूपात सुद्धा असते. काही वेळेस आपण पैसे उधार देतो किंवा परत देण्याच्या मुदतीवर उसने देतो व आपल्या काही व्यक्तींना अशी मदत करतो. कारण जीवनात अडचण ही सर्वांनाचं असते त्यामुळे आपण चांगल्या भावनेने मदत करतो परंतु काही लोक जे बोलतात तसे वागत नाहीत. काही लोक पैसे घेताना चांगले वागतात. मुदत मागून गयावया करतात पण परत करायच्या वेळी टाळाटाळ करतात काही जण तर गायब होतात.मग अशा वेळी माणूस मोठ्या संकटात सापडलेला असतो कारण जोर-जबरदस्तीने पैसे मागितले की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून त्यासाठी उधार दिलेले पैसे आपल्याला काही दिवसातच मिळतील. यासाठी एक जालीम उपाय करायची गरज आहे. आपण एखाद्याला त्याच्या संकटाच्या वेळी पैसे उधार देतो परंतु जेव्हा हेच पैसे परत देण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती 100 कारणे सांगते. यामुळे मानसिक तणाव सहन करावा लागतो.हा एक असा प्रचंड प्रभावशाली आणि वशीकरण उपाय आहे की, ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत. उधार पैसे घेतले पण तो परत करत नाहीये त्याला परत करणारे हे उपाय आहेत. हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करेल. पॉझिटिव्ह विचार करू लागेल आणि तुमचे पैसे (Payment) परत करण्याचा निश्चय करेल. जर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन-तीन दिवसात तुमचा पैसा तुमच्याकडे परत येईल. तेव्हा ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीकडे पैसे येतील ते पैसे परत करील.हा उपाय करताना तो विश्वासाने, श्रद्धेने करावा त्यासाठी हा उपाय करावा. एक अत्यंत प्रभावशाली उपाय हा उपाय आपण शुक्रवारी करायचा आहे. माता लक्ष्मीचा वार आहे. शुक्रवारच्या दिवशी आपण कापरापासून काजळ तयार करायचे आहे. वाटीमध्ये किंवा कोणत्याही पात्रात भरपूर कापूर घ्या.10 ते 12 वड्या कापून घ्या. तो जाळल्या नंतर त्यातुन धूर बाहेर पडतो यावरती एक छोटीशी वाटी धरा व काजळी गोळा करा. या पात्रामध्ये तर त्या ठिकाणी काळसर अशा प्रकारचं काजळी त्या ठिकाणी जमा होईल आणि जमा झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकायचे, त्याला बाजारात सरसो का तेल असंही म्हणतात. तर मोहरीचे तेल घेऊन आपण त्यात थोडे तूप टाकून घ्यायवे. दोन-तीन थेंब तरी टाकावे.मग त्यानंतर त्या ठिकाणी काजळ तयार होईल. या काजळाचा वापर करून आपण भूर्जपत्रावर जर ते नसेल तर अगदी साधा कोरा कागद ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा प्रकारचा कोरा कागद त्यावरती आपण आपल्या शत्रूंचा नाव लिहायचय. फक्त पहिलं नाव संपूर्ण नाव लिहण्याची आवश्यकता नाही.तुमची इच्छा असेल तर पूर्ण नाव लिहिलं आणि तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्ती बद्दल तुम्ही विचार करत आहात तेव्हा त्या व्यक्तीविषयी हा टोटका लागू पडतो. ज्याने उधार पैसे घेतले आहेत. त्याचे सात वेळा नाव घ्या. त्याच्या नावावर थाप मारा. त्यानंतर हा जो कागद आहे तो कागद आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे.कोणतेही कोपऱ्यामध्ये तिजोरीत, तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा.त्या ठिकाणी त्यावरती काही ना काही तरी जड वस्तू ठेवायची. अशी व्यक्ती आपले उधार पैसे (Payment ) देईल. त्यामुळे उधार घेणाऱ्या व्यक्तीचे मन परिवर्तन होईल आणि तो आपले पैसे परत देतो, असा हा उपाय करा. यासाठी खडेमीठ जे असते ते लागेल. खडेमीठ आणायचे आहे. वापरतो ते बारीक मीठ घेऊ नका.तंत्र शास्त्रामध्ये खडेमीठ खूप महत्वाचे आहे, मोठ्या मिठाची मोठ्या आकाराचे 11 खडे घ्या. एखाद्या कपड्यांमध्ये हे अकरा खडे ठेवायचे, सोबतच त्यामध्ये आपण 11 साबुत लवंगा घ्या, हा मसाल्याचा पदार्थ आहे, तर अशा अकरा साबुत म्हणजे न फुटलेल्या, त्यांना समोर फुल असते, अशा 11 लवंगा सात आपल्याला ठेवायच्या आहेत. हा उपाय आपण मंगळवारी करू शकता किंवा मंगळवार पेक्षाही प्रभावी दिवस म्हणजे शनिवारचा दिवस, हा शनी देवाचा वार असतो , कोणत्याही दिवशी आपण करू शकता. हा उपाय आपण रात्री करायचा.सूर्य मावळल्यानंतर लाल रंगाचे कपड्यामध्ये अकरा मिठाचे खडे आणि अकरा साबूत लवंग ठेवायचे आहेत आणि त्याची पोटली करायची, पोटली म्हणजे पुरसुंडी बांधा. यानंतर सात वेळा थापा मारायची. सात वेळा थाप मारीत मिठाच्या आणि लवंगच्या पोटलीवरती आपल्या शत्रूचं नाव घेत आपण थाप मारावी.त्या व्यक्तीचे फक्त नाव,किंवा पूर्ण नाव घेऊ शकता. मग अशा प्रकारे सात वेळा थाप मारायचे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास चौक जिथे असतो, चार रस्ते एकत्र येतात त्या चौकांमध्ये गुपचूप जा, तुमच्या घराच्या जवळपास जर चौक असेल तरीही चालेल.चौकात हा उपाय करत बसू नये. उपाय करून मग जावे. म्हणजे ती पोटली चौकात गुप्त ठिकाणी ठेवा.टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म