अनेकदा क्षणभराचा आनंद जीवावर बेतल्याच्या घटना समोर येत असतात. झोका खेळताना काहीतरी दुर्घटना होऊन मृत्यू (death) झाल्याच्या तर कित्येक घटना आपण ऐकतो. झोका खेळताना अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. मात्र बऱ्याचदा फक्त लहान मुलंच नाही तर अगदी तरुणही अशा घटनांमध्ये जीव गमावतात. अशीच एक धक्कादायक घटना जळगावमधून समोर आली आहे.
यात झोका खेळताना एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू (death) झाला आहे. झोका खेळताना झोक्याची दोरी गळ्यात अडकून गळफास लागल्याने या तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात घडली. विधी स्वप्निल पाटील असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 01-12-22
विधी पाटील ही तरुणी आपल्या राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावर झोका खेळत होती. मात्र पुढच्याच क्षणी आपल्यासोबत काय घडणार आहे, याची कल्पनाही तिला नव्हती. झोका खेळताना अचानक दोर तिच्या गळ्यात अडकला. या घटनेत गळफास लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.