महाराष्ट्राची (Health) चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या संयोगातून तयार झालेला नवा घातक कोरोना महाराष्ट्रात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातील साडेपाचशेपेक्षा जास्त रुग्ण रडारवर असून त्यात राज्यातील रुग्णांचाही समावेश असल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकाराने चीन आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कहर केला आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नवा व्हेरिएंट हा अधिक संसर्ग करणारा असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. एक रुग्ण कमीत कमी 12 लोकांचा संसर्ग करु शकतो. असं तज्ज्ञांचं मत आहे.
हे वाचा : Bollywood: “मी आयुष्याच्या नव्या वर्षात…”, वाढदिवसानिमित्त कंगना रणौतची खास पोस्ट चर्चेत
भारतात जूनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. पण ती किती परिणाम कारक असेल हे अजून सांगता येणार नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. काही जण चौथी लाट येणार नाही असं देखील म्हणत आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे वाढते रुग्ण पाहता भारतात देखील उपाययोजना सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने आधीच राज्यांना याबाबत सतर्क केले असून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.