Saturday, June 21, 2025

Political भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पाय उतार होणार, ‘हे’ असणार नवे राज्यपाल?

आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातील (Political) महत्त्वाची बातमी. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपचीही अडचण निर्माण झाली होती. त्यातच विरोधकांनीही त्यांना हटविण्याची मागणी होती.

आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  कोणत्याही क्षणी पाय उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवे राज्यपाल कोण असणार याचीही उत्सुकता आहे. दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल (Political) पदावरुन आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली. यानंतर आता जर कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यास पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरु झाली. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. मात्र याची पुष्टी कुणाकडूनही झालेली नाही आहे.

हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 27-01-23

कोण आहेत अमरिंदर सिंह?

  • कॅप्टन अमरिंदर सिंह हे पंजाबच्या राजकारणातील मोठे नाव आहे.
  • पंजाबमध्ये अमरिंदर सिंह यांच्या नावाचा प्रचंड दबदबा होता.
  • काँग्रेस पक्षात असताना मोठा दबदबा. अमरिंदर सिंह अनेक वर्षे पंजाब आणि काँग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवर कार्यरत
    1963 – 1966 या काळात ते भारतीय लष्करात होते.
  • अमरिंदर सिंह यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजा होते.
  • अमरिंदर सिंह हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
  • कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Political) दिला होता.
Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म