राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. (political) हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका भाजप आमदारावर शाईफेक झाल्याचे प्रकरण घडले आहे.
विजयकुमार देशमुख असं या भाजप आमदारांचं नाव असून ते सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले आहेत. विजयकुमार देशमुख यांच्यावर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करण्यात आली आहे.
हे वाचा : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला भरधाव ट्रकची समोरुन जोरदार धडक!
आमदार विजयकुमार देशमुख हे काल (13 डिसेंबर) एका विवाहाला गेले होते. त्यावेळी विवाहस्थळीच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून विजयकुमार देशमुख यांच्यावर शाई फेकण्यात आली. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांमुळे देशमुख यांच्यावर शाई पडली नाही.