किल्ले प्रतापगडावर आज 365वा शिवप्रताप दिन आहे. या शिवप्रताप दिनाच्या सोहळ्या निमित्त प्रताप गड सजला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसलेही यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण आहे.
मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यामुळे उदयनराजे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच राज्य सरकारने राज्यपालांचा साधा निषेधही न नोंदवल्याने उदयनराजे भोसले या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किल्ले प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनास आज मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले जिल्हयातील इतर आमदार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांना निमंत्रण आहे. पण त्यांच्या उपस्थित राहण्याबाबत साशंकता वर्तवण्यात येत आहे.
हे वाचा : स्मार्ट कार्ड काढण्याची चिंता मिटली,’या’ पद्धतीनंही मिळणार एसटीत सवलत
किल्ले प्रतापगडावर ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आणि झेंड्याचे पूजन केलं. संपूर्ण प्रतापगड भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आला आहे. तसेच गडावर विद्यूत रोषणाईही करण्यात आली आहे.त्यामुळे संपूर्ण गड परिसर भगवामय झाला आहे. तर पालखीच्या भोईंनी शिवकालीन पोषाख करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे.
प्रतापगडावर छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी उंब्रजवरून असंख्य सायकल स्वार आले आहेत. सायकलस्वारांनी इथे तयार केलेल्या रस्त्यांची केली स्तुती केली आहे. छत्रपती शिवराय त्या काळात गड कशा पद्धतीने सर करत असावेत? त्यांचं अश्वधन गडावर कसं जात असावं? याचा सायकलवरून जाऊन तरुणांनी अनुभव घेतला. शिवप्रताप दिन हा आमच्या जिवाभावाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया या सायकलस्वार तरुणांनी दिली आहे.












