शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता अस्तित्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेला नवं नाव आणि पक्षचिन्ह (sign) सुद्धा मिळालं आहे. तर शिंदे गटाला नाव तर मिळाले आहे, पण अजूनही पक्षचिन्ह मिळाले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाकडे वेळ थोडाच राहिला आहे.
10 वाजेच्या आत निवडणूक आयोगाकडे नव्या चिन्हाचा पर्याय शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडे द्यायचा आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला ‘शिवसेना ’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव बहाल केले. मात्र, शिंदे गटाला कोणतेही चिन्ह (sign) मिळू शकलेले नाही. शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा असे चिन्ह दिले होते. पण, आयोगाने ते रद्द ठरवले.निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत.
त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती.धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह (sign) बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.
दरम्यान, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा स्वत:चा फोटोही शेअर केला.












