छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Political News) यांनी वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अजितदादांच्या वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अजितदादा माफी मागेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा भाजपने दिला आहे. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे.
आज मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. जोपर्यंत अजित पवार माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यावरुनही वाद निर्माण झाला आहे.
आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणतो. काहीजण त्यांना धर्मवीर म्हणतात. मात्र, राजे हे धर्मवीर नव्हते, असे अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान म्हटले होते. त्यानंतर आता अजितदादांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. या वादात आता भाजपने उडी घेतली आहे. अजित पवारांविरोधात राज्यभर निदर्षने देखील केली जात आहेत.
हे वाचा : प्रेयसीच्या घरात घुसून Happy New Year बोलणाऱ्या प्रियकराला कुटूंबाने दिले ‘रिटर्न गिफ्ट’!
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते, आहेत आणि पुढेही राहतील, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी अजित पवार (Political News) यांना अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचाही निषेध त्यांनी केला आहे. अजित पवार यांनी अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. अजित पवारांचे विधान हे अर्धसत्य आहे. तेव्हा त्यांनी ते विधान मागे घ्यावे, अशी मागणीही छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
त्याचवेळी त्यांना आव्हानही दिले आहे. अजित पवार यांनी कोणता ऐतिहासिक संदर्भ जोडला तेही सांगावे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप मुंबईत आंदोलन करणार आहे. याआधी हिंगोली येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन केले.
यावेळी अजित पवार यांच्यावर कारवाई करा, मागणी करण्यात आली. पुणे-नाशिकमध्येही अजित पवारांविरोधात भाजपनं आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार निदर्शने केली. पुण्यात खंडोजीबाबा चौक छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक अजित पवार (Political News) यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आले. तर नाशिकमध्येही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.