प्रत्येकाला दररोज एकच पदार्थ (Recipe) खायला आवडत नाही. प्रत्येकवेळी जेवनामध्ये काहीतरी वेगळे असावे, अशी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र, घरातील महिलांपुढे दरवेळी मोठा प्रश्न हाच असतो की, नवीन खाण्यासाठी काय करावे?
विशेष म्हणजे लहान मुलांसाठी कारण त्यांना आवडले पण पाहिजे आणि ते हेल्दी देखील असावे. तर आज आम्ही तुम्हाला एका खास डिशबद्दल सांगणार आहोत. जी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील असेल घरातील प्रत्येकजण आवडीने खाईल. चला तर बघूयात पनीर सँडविचची खास रेसिपी!(Recipe)
साहित्य
ब्रेड स्लाईस 6, 1 कप पनीर किसलेले, एक कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरलेले, एक टीस्पून आले आणि लसूण पेस्ट, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून चाट मसाला, टीस्पून जिरे, आवश्यकतेनुसार लोणी, एक चमचा हिरवी कोथिंबीर बारीक चिरून, एक चमचा तेल, चवीनुसार मीठ.
पनीर सँडविच रेसिपी
(Recipe) पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक पॅन घ्या आणि त्यात तेल घाला आणि ते गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात प्रथम जिरे टाका आणि नंतर बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. यानंतर आले आणि लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतवा. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. यानंतर त्यात चिमूटभर हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, चाट मसाला वगैरे घालून सर्व काही नीट मिक्स करून घ्या.
हे शिजल्यावर त्यात किसलेले पनीर घालावे. पनीर घातल्यानंतर गॅस मंद ठेवा, त्याचे पाणी कोरडे करा आणि सर्व गोष्टी नीट मिक्स करा. त्यानंतर कोथिंबीरीने टाका. आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यावर थोडे बटर घाला. नंतर ब्रेडचा स्लाईस ठेवा. या स्लाइसवर पनीरचे स्टफिंग ठेवा आणि स्लाइसवर पसरल्यानंतर दुसऱ्या ब्रेडने झाकून ठेवा. बटरच्या मदतीने सँडविच दोन्ही बाजूंनी पलटवून सोनेरी होईपर्यंत बेक करा. यानंतर मुलांना गरमागरम चविष्ट सँडविच सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या.