कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या म्हणजे 12 नोव्हेंबरला दिवाळीचा (Diwali) सण साजरा केला जाईल. ज्योतिषाचार्य पं. अश्विनी मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.पाच दिवसांचा दिवाळीचा सण यावेळी 6 दिवसांचा असणार आहे. यावेळी दिवाळीच्या महापर्वाची सुरुआत 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशीपासून होणार आहे.
तसेच मासिक शिवरात्री 11 नोव्हेंबरला आहे. 7 वर्षांनी एकाच दिवशी 12 नोव्हेंबर रोजी रूप चतुर्दशी, छोटी आणि मोठी दिवाळी साजरी केली जाईल. 13 तारखेला सोमवती आणि देव पितृकार्य अमावस्या, 14 तारखेला गोवर्धन आणि 15 नोव्हेंबरला भाऊबीजने दिवाळीचा समारोप होईल.
हे वाचा : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे ‘त्या’ मागणीवर ठाम
ज्योतिषाचार्य यांच्यानुसार, यावेळी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. मात्र, 11 नोव्हेंबरला दुपारी 1:58 ला चतुर्दशी तिथी येईल. या कारणाने 12 नोव्हेंबरला सकाळी रूप चतुर्दशी स्नान होईल. तसेच 12 नोव्हेंबरला अमावस्येचे आगमन दुपारी 2.45 वाजता होईल. या कारणास्तव 12 नोव्हेंबरलाच महालक्ष्मी पूजन (Diwali) आणि दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
14 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदा मुहूर्त 9 पेक्षा जास्त असल्यास, 14 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा आणि 15 नोव्हेंबर रोजीला भाऊबीज साजरा केली जाईल. यावेळी, नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी आणि दिवाळी या दोन्ही एकाच दिवशी असतील. 12 नोव्हेंबरला सकाळी रूप चतुर्दशी आणि सायंकाळी लक्ष्मीपूजन असेल.