gaj kesari yog akshay tritiya in marathi पंचांगानुसार वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येते. हा दिवस अतिशय शुभ मानला गेला असून यादिवशी सोनं चांदीसह कार, घर खरेदी करण्यात येते. नवीन व्यवसाय असो किंवा शुभ कार्यासाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
यंदा अक्षय्य तृतीयाचा दिवस द्विगुणीत शुभ लाभ देणारा ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयाचा शुभ मुहूर्तावर गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे ही अक्षय्य तृतीया काही राशी लोकांसाठी कुबेरचा खजिना घेऊन आली आहे. अक्षय्य तृतीयेला धन योग, शुक्रादित्य योग, रवियोग आणि सुकर्म योग असणार आहे. कोणत्या आहेत भाग्यशाली राशी जाऊन घ्या.
वृषभ : या राशीच्या लोकांना अक्षय्य तृतीयेला आर्थिक (gaj kesari yog akshay tritiya in marathi) लाभ होणार आहे असं भाकीत करण्यात आलंय. तुमच्या आयुष्यात खूप आनंद असणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करणार असून तुम्हाला भरपूर नफा प्राप्त होणार आहे. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होणार आहे.
मिथुन : अक्षय्य तृतीयेला तयार होणारा शुभ योग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमची रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. तुमच्या व्यवसायात नफा मिळणार आहे. बँक बॅलेन्स दिवसेंदिवस वाढणार आहे.
कर्क :अक्षय्य तृतीया या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. यांच्या आयुष्यात आनंद दार ठोकणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ मिळणार आहे. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सुख-सुविधा वाढ होणार आहे.
तूळ : या राशीच्या लोकांना अक्षय्य तृतीयेपासून (gaj kesari yog akshay tritiya in marathi) गोल्डन टाइम सुरु होणार आहे. तुमची सर्व नियोजित कामं पूर्ण होणार आहेत. जीवनात सुखसोयी मिळणार आहेत. आर्थिक समस्या दूर होणार असून सोने खरेदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
धनु : अक्षय्य तृतीयेला तयार होत असलेला शुभ योग या राशीच्या लोकांना उत्तम लाभ घेऊन येणार आहे. हा काळ तुम्हाला अनेक प्रकारे लाभदायक ठरणार आहे. गुंतवणुकीसाठी अक्षय्य तृतीयाचा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला चांगला परतावा या काळात मिळणार आहे. अडकलेले पैसे मिळणार असल्याने आर्थिक स्थिती बदलणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. स्मार्ट इंडिया या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)