रामनवमीच्या उत्सवानंतर आता सर्वांना हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti 2024) वेध लागले आहेत. मात्र, यावेळी चैत्र महिन्यात दोन दिवस पौर्णिमा तिथी असल्याने लोकांमध्ये हनुमान जयंतीच्या तिथीबाबत एक संभ्रमावस्थाची स्थिती तयार झाली आहे.चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हनुमानाचा जन्म झाला होता.
त्यामुळे प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी 2 दिवस पडत आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे हनुमान जयंती कधी साजरा केली जाईल, याबाबत जाणून घेऊयात.
ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, हिंदू पंचांगानुसार यावेळी चैत्र महिन्याची पौर्णिमा 23 एप्रिल रोजी सकाळी 03:30 मिनिटांनी सुरू होऊन 24 एप्रिल रोजी सकाळी 05:18 पर्यंत राहील. यानुसार हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti 2024) सण हा 23 एप्रिल रोजीच साजरा केला जाईल. सोबतच 23 एप्रिल रोजी मंगळवार असल्याने हनुमान जयंतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्यामुळे याच दिवशी हनुमान जयंतीचा सण साजरा केला जावा.
पूजेचा शुभ मुहूर्त –
ज्योतिषाचार्य यांनी पुजेच्या मुहूर्ताबाबत सांगितले की, पूजेचा पहिला शुभ मुहूर्त 23 एप्रिल रोजी सकाळी 9:05 वाजेपासून ते दुपारी 1:55 पर्यंत राहील. यानंतर दुसरा शुभ मुहूर्त 23 एप्रिल रोजी रात्री 8:15 वाजेपासून ते रात्री 09:35 पर्यंत राहील. याचप्रकारे ब्रह्म मुहूर्त 23 एप्रिल रोजी सकाळी 4.24 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत राहील. तर अभिजीत मुहूर्त हा सकाळी 11:55 वाजेपासून ते दुपारी 12:40 वाजेपर्यंत राहील. या मुहूर्तावर तुम्ही हनुमानाची पूजा करावी.
पूजा कशी करावी –
हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti 2024) दिवशी पूजा करण्यासाठी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठावे आणि सर्व कामे आटपून शुद्ध पाण्याने अंघोळ करावी. घराजवळ एखादी पवित्र नदी असेल तर त्यामध्ये स्नान करावे. यानंतर हनुमानाची शुभ मुहूर्तावर पूजा करावी. सर्वात आधी एक लाकडी चौकट घ्यावी. त्यावर लाल रंगाचा कापड टाकावा आणि हनुमानासोबत भगवान श्रीरामाचा फोटो ठेवावा. त्यानंतर फूल, माळा, शेंदूरसोबत देवाला आवडणारे पदार्थ जसे की, बूंदी, बेसनाचे लाडू, गुळ हरबरा, तुळशी अर्पण करावी.
आता हनुमानासमोर शुद्ध तुपाचा दिवा आणि धूप लावून श्री हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यानंतर आरती करावी आणि भक्तांना प्रसादाचे वितरण करावे. हनुमानाचा मूल मंत्राचा आणि कवच मंत्राचा जप करावा. (ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः॥हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्।) (श्री हनुमते नमः)
Disclaimer : Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद साधल्यानंतर लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक असून स्मार्ट इंडिया याबाबत कोणताही दावा करत नाही.