6 महिन्यांनंतर आता केदारनाथाची कवाडं उघडली आहे (VIDEO). त्यासाठी गेल्या महिन्यात रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. आजपासून केदारनाथाचं दर्शन सुरू झालं आहे. ज्यांना केदारनाथ मंदिरात जाता येणार नाही त्यांना घरबसल्या दर्शन घेता येणार आहे.
केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी पूर्ण विधीपूर्वक उघडण्यात आले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे या सोहळ्यासाठीउपस्थित होते. दरवाजे उघडण्याच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी पोहोचले. धाममध्ये यात्रेकरूंसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजेही आज उघडण्यात येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि जवान यांची कडेकोट सुरक्षा केदारनाथ मंदिरात ठेवण्यात आली आहे. प्रशासनाच्या उपस्थितीत मुख्य गेटचे कुलूप उघडण्यात आले. यानंतर गर्भगृहाचा दरवाजा उघडण्यात आला. रावल आणि मुख्य पुजारी यांनी गर्भगृहात पूजा केली.VIDEO
केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यावर बाबा केदारनाथची विधिवत पूजा केली जाते. उत्तर भारतातील पूजेची पद्धत थोडी वेगळी आहे. सकाळी 10.29 वाजता यमुनोत्री धामची कवाडं उघडली जाणार आहेत. गोत्री धामचे दरवाजे पुढील 6 महिने रात्री 12.25 वाजता उघडले जातील.VIDEO भैरव मंदिरातून गंगोत्री धामकडे मातेची गंगा मिरवणूक निघाली आहे. दोन्ही धामांमध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
Kedarnath is not a mere place, it is a life changing divine experience.. !
Har Har Mahadev..!#Kedarnath #KedarnathDham pic.twitter.com/6DuqFcnD05
— Girish Bharadwaj (@Girishvhp) May 10, 2024
झेंडुच्या फुलांची खास सजावट केदारनाथ मंदिराला करण्यात आली आहे. अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. ज्यांना केदारनाथाच्या दर्शनासाठी जायचं आहे त्यांनी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेन करणं बंधनकारक आहे. त्यानंतर दर्शनासाठी जाता येणार आहे. केदारनाथ मंदिराच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.